Gulabi Sadi Teacher Dance : हल्ली कधी कोणतं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून
View this post on Instagram
रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून विविध भाषांतील नवनवीन गाणी सतत व्हायरल होत असतात, ज्यावर लाखो लोक रील बनवतात. सध्या सोशल मीडियावर ‘सूसेकी’, ‘बदो बदी’ ही गाणी खूप चर्चेत आहेत. पण, या गाण्यांव्यतिरिक्त आणखी एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेले ‘गुलाबी साडी’ या गाण्याने अक्षरशः अनेकांना भुरळ पाडली. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच सामान्यांपासून अनेक दिग्गज कलाकारांपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रील्स केले आहेत. या गाण्यावर डान्सचे काही सुंदर व्हिडीओ याआधीदेखील खूप व्हायरल झाले, पण आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका शाळेतील आहे, ज्यामध्ये चक्क एक शिक्षक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
View this post on Instagram
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. आतापर्यंत आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांसोबत गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शाळेतील वर्गामध्ये एक शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांच्या मधोमध उभे असून ते विद्यार्थ्यांसोबत गुलाबी साडी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी शिक्षकासोबत विद्यार्थीदेखील सुंदर डान्स आणि हटके एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहेत. हा सुंदर व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये शाळेमध्येही गुलाबी साडी, असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओवर आतापर्यंत बारा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, यावर आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करत आहेत. ज्यात एका युजरने लिहिलंय की, “ही कोणती शाळा आहे?”, तर दुसऱ्या युजरने, डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक्स्प्रेशनचे कौतुक केले आहे; तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “शिकू द्या रे लेकरांना, उगाच नका नादी लावू”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “मुलांच्या शाळा आणि अभ्यासावर लक्ष्य द्या, हे आपल्याला आयुष्यभर कधीही शिकता येईल.”
दरम्यान, यापूर्वीही गुलाबी साडी या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवल्या होत्या. हे रील्स सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल झाले होते. त्यात एका महिलांच्या ग्रुपनेदेखील गुलाबी नऊवारी साडी नेसून, मराठमोळ्या पद्धतीने डान्स केला होता. तसेच काही पुरुषांनी मॉर्निंग वॉकला गेल्यावर रील बनविली होती
View this post on Instagram