अरे ही कसली आई? रीलसाठी चिमुकल्याला घेऊन ओढली सिगारेट, महिलेचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर

Mother smoking video viral: आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम आई करत असते. अगदी लहानपणापासून काय चूक काय बरोबर हे ती आपल्या मुलांना शिकवते. त्याच संस्कारांनी, शिक्षणाने मोठी झालेली मुलं मनाने जास्त मोठी होतात, दुसऱ्यांचा आदर करायला शिकतात. पण, जर आईच मुलांना घडवायला चुकली तर त्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Memerlust 💫 (@indianmemerlust)

सध्या सोशल मीडियावर दिवसेंदिवस लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी आणि काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक आपली हद्द पार करू लागले आहेत. आताच्या पिढीतील काही लोक जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत. सध्या एक असाच लाजिरवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन धक्कादायक कृत्य करताना दिसतेय.आईचं संतप्त कृत्य व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन व्हिडीओ बनवताना दिसतेय. पण, व्हिडीओच्या नावावर ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. सिगारेट ओढत ओढत ती महिला चिमुकल्याला कंबरेवर घेऊन रील करताना दिसतेय. या सिगारेटच्या धुरामुळे लहानग्याला त्रास होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये चिमुकला खोकताना दिसतोय तरी ती महिला हातात सिगारेट घेऊन व्हिडीओ बनवताना दिसतेय.हा व्हिडीओ @_am_pratham या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “ये क्या हो गया है आजकल के जनरेशन को” (हे आजकालच्या पिढीला काय झालंय) असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Memerlust 💫 (@indianmemerlust)

युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ती एक आई म्हणून अपयशी ठरली”, तर दुसऱ्याने “अशा मुलींची लाज वाटते” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “असे लोक आई होण्याच्या पात्रतेचे नाहीत”, तर “यांच्या कानाखाली दिली पाहिजे, यांची सगळी नशा उतरून जाईल”, अशी संतप्त प्रतिक्रिया आणखी एका युजरने दिली. आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Memerlust 💫 (@indianmemerlust)

Leave a Comment