Ration Card New Update : रेशनच्या बाबतीत राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर

Ration Card New Update : नमस्कार मित्रांनो, राज्यातील नव्याने राशन कार्ड बनवलेल्या मात्र अद्यापही अन्न धान्याचे वाटप सुरु न झालेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय आणि महत्वपूर्ण अपडेट्स आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड बाबत एक अतिशय महत्वाचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. या काढण्यात आलेल्या GR मुळे राशनकार्ड च्या संदर्भातील जिल्हा निहाय इष्टकामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत महाराष्ट्र राज्याला लक्षाक देण्यात आलेले आहेत, ज्यांच्यामध्ये ग्रामीण भागासाठी जवळपास 76.32% तर शहरी भागासाठी 45.34% एवढी लाभार्थी संख्या महाराष्ट्र राज्यासाठी निश्चित करण्यात आलेली आहे.

मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या कट ऑफ date देऊन वेळोवेळी लाभार्थ्यांची संख्या निश्चित केली जात असते, परंतु राज्यासाठी दिलेल्या एकूण इष्टाकांची पूर्तता होत नसल्यामुळे अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब सदस्याचा सुधारित इष्टांक देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण बदल असे करण्यात आलेले आहेत.आणि याच्याच साठी 28 फेब्रुवारी 2022 चा GR रद्द करून हा नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील शासन निर्णय म्हणजे GR आपण पाहू शकता, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अन्वये सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोक संख्येपैकी 76.32% ग्रामीण व 45.34% शहरी लोक संखेची मर्यादा दिलेली आहे.

सदर सुधारित इष्टांक देताना या मयदिसाठी जिल्हा, शहर, गाव, हे घटक विचारात न घेता राज्य हा घटक विचारात घेऊन त्याचा राज्यातील ऐकून संख्येपैकी 76.32% ग्रामीण व 45.34% शहरी आशा प्रकारे गरजू लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे. अंतदोय अन्न शिधा पत्रिकेचे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थाचे निवड करण्याकरिता या GR सोबत जोडण्यात आलेल्या विवरण पत्रासमोर प्रत्येक जिल्ह्यासमोर दर्शविलेल्या इष्टांकाच्या आकडेवारीच्या मर्यादे मध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी अशा प्रकाचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याच्याच सोबतच विवरण पत्र आपण पाहुयात ज्याच्या मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत ज्याच्यामध्ये जिल्हा निहाय इष्टांक देण्यात आलेले आहेत. याच्या मध्ये अंतदोय अन्न शिधापत्रिकेची संख्या देण्यात आलेली आहे. याच प्रमाणे प्राधान्य कुटुंबातील सदस्य संख्या या मध्ये देण्यात आलेली आहे.

 

➡️➡️ येथे संपूर्ण शासन जीआर पहा ⬅️⬅️

 

मुंबई अ परीमंडळ,ड परीमंडळ, ई परीमंडळ, य परीमंडळ व तसेच ग परीमंडळ अशा प्रकारे मुंबई ठाणे एकूण शिधापत्रिक साठी जवळ जवळ 15674 अंतदोय अन्न पत्रकेच्या शिधा पत्रिका आणि 71,26137 प्राधान्य कुटुंब संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.याचप्रमाणे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे ग्रामीण, पुणे शहर, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, याचप्रमाणे जालना, बीड, नांदेड,धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर,वर्धा,गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, व गडचिरोली अशी जी काही 42 मंडळ आहेत या 42 मंडळासाठी जवळपास 25 लाख 5300 अंतदोय अन्न योजनेच्या शिधा पत्रिका व याच प्रमाणे 5 कोटी 92 लाख 16 हजार 31 आशा प्रकारे ही जी काही प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आहेत अशी लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

आणि याच्यासाठी प्रत्येक जिल्हा मधील अंतोदय अन्न योजना याच प्रमाणे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या हे इष्टांक आता नव्याने देण्यात आलेले आहेत.ज्याच्यामुळे नव्याने रेशन कार्ड बनवलेल्या परंतु अद्याप अन्न धान्य वाटप न होणाऱ्या लाभार्थ्यांना याच्या मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचा हा एक GR राज्य सरकार कडून निर्गमित करण्यात आलेला आहे Ration Card New Update.

 

➡️➡️ येथे संपूर्ण शासन जीआर पहा ⬅️⬅️

Leave a Comment